मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आणखी एक आव्हान उभे राहिले आहे आणि ते म्हणजे फसवणूकीचे एक आव्हान आहे. मुंबईत कोरोना आजाराचा फायदा घेण्यासाठी लोकं खोटे अहवाल घेणारे आणि खोटे अहवाल देणारे लोकं यांची मुंबई पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहेत. त्याच वेळी, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत, परंतु रिपोर्टमध्ये छेडछाड करुन प्रवास करीत आहेत त्यांना देखील पोलिसांकडून पकडले जात आहे.अब्दुल सादिक खान नावाच्या व्यक्तीला बोगस रिपोर्ट बनवल्याच्या आरोपाखाली शिवाजी नगर परिसरातून अटक केली आहे. खाजगी लॅबमधून नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवणे हे सादिकचे काम होते. पण त्याने काही रुपये घेतले आणि कोरोनाचा बनावट अहवाल स्वत: च्या हाताने बनवून लोकांना दिला. पोलिसांनी सादिकविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, त्यानुसार कलम ४२०, ४१८, ४६५, ४६८, ४७१, ५०० आणि १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना प्राथमिक एकूण सहा बोगस कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. या रिपोर्टशी संबंधित लोकांचा शोध पोलिस घेत आहेत. सादिकच्या संगणकाची प्रयोगशाळेमध्ये चाचणी घेण्यात येत असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. मुद्दा फक्त सादिकच्या फसवणुकीचा नाही. कोविड पॉझिटिव्ह असलेल्या मुंबईतील खार भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील ३ जणांनीही त्यांच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड केली आणि मुंबईहून विमानाने जयपूरला जाण्याच्या विचारात होते. जयपूर ट्रिपच्या काही काळआधी त्याला विमानतळावर थांबविण्यात आले होते. त्यांच्याविरोधात बीएमसीने पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल केला आहे. हा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबीयांनी हा अहवाल बनावट मार्गाने निगेटिव्ह बनविला होता.जनतेकडून बनावट रिपोर्ट बनवणं पुढे मोठे आव्हान ठरू शकते. या प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असे सांगितले आहे. चुकीचा अहवाल देणाऱ्या व्यक्तीवरच कारवाई केली जाऊ नये तर चुकीचा अहवाल घेणाऱ्यावरही कारवाई केली पाहिजे. या प्रकरणात, बीएमसी आता एक पथक तयार करणार आहे, जे कोरोना चाचणीच्या ठिकाणी जाईल आणि पुन्हा पुन्हा तेथे जाऊन तपासणी करत राहील. महापौर म्हणतात की, 100 पैकी 95 लोक बरोबर आहेत, परंतु पाच लोक चूक करतात आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
कोरोना रिपोर्टशी छेडछाड करणारा अटकेत; पैसे घेऊन बनवत होता बोगस रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 7:08 PM
Coronavirus False Report : रिपोर्टमध्ये छेडछाड करुन प्रवास करीत आहेत त्यांना देखील पोलिसांकडून पकडले जात आहे.
ठळक मुद्देअब्दुल सादिक खान नावाच्या व्यक्तीला बोगस रिपोर्ट बनवल्याच्या आरोपाखाली शिवाजी नगर परिसरातून अटक केली आहे.