शिरपूर/अर्थे : तालुक्यातील अर्थे बु. येथे म्हाळसादेवी तर उंटावद येथे सुलाई मातेचा यात्रोत्सव चैत्र शुध्द पौर्णिमेला भरत आहे.अर्थे- येथील म्हाळसादेवीच्या यात्रोत्सवाला चैत्र शुद्ध चर्तुदशीपासून सुरुवात होत आहे. खानदेशातील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येथे येतात. नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गर्दीने फुलून जातो. पंचक्रोशीतील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर ट्रस्टमार्फत जय्यत तयारी सुरू आहे. विश्वस्त मंडळाने मंदीर परिसरात अनेक सोयी भाविकाच्या देणगीतून उपलब्ध करुन दिल्या आहेत. विश्वस्त मंडळाने म्हाळसा देवीच्या मंदीराच्या बाजुला श्रीगणेश व महादेव मंदीराचे काम हाती घेतले आहे. ते पुर्णत्वाकडे आले आहे. या मंदीरांचा जिर्णोद्धार मे महिन्यात करण्यात येणार आहे. यात्रोत्सवाच्या पाशर््वभूमीवर मंदिराची सजावट करण्यात येत असून परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. खाद्य पदार्थ, रसवंती, पूजेचे साहित्य, खेळणी, मनोरंजनासाठी पाळणे, संसारोपयोगी साहित्याची दुकाने, व्यावसायिकांनी थाटण्यास सुरुवात केली आहे. यात्रेनिमित्त लोकनाट्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. उंटावद- अरुणावती नदीच्या काठी असलेल्या उंटावद या गावी उत्तर महाराष्टÑातील एकमेव असे सुलाई मातेचे हे एक मंदिर आहे. १३ एकर जागेत सभामंडप २४०० चौरस फुट असून मंदिर ४२ बाय ४२ फुट आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची ६८ फुट असून २१ फुट उंच असलेल्या चार कॉलमवर हे मंदिर बांधण्यात आले आहे. सुलाई माता मंदिराचा गाभारात १३ बाय १३ फुट आहे. गाभाºयांपासून कळस ४८ फुट उंच आहे. या मंदिर परिसरात फळझाडे व वनराई यामुळे येथील नैसर्गिक वातावरण भाविकांना आल्हाददायक व पवित्र वाटते. जुने मंदिर हे ७०० वर्षापूर्वीचे असावे, असे सांगितले जाते. खानदेशातून भाविक मोठ्या श्रध्देने सुलाई मातेच्या दर्शनाला येतात व यात्रेचाही लाभ घेतात. शिरपूर शहरापासून अवघ्या २ किलोमिटर अंतरावर दक्षिणेला उंटावदला सुलाई मातेचे हे मंदिर आहे. १८ पासून यात्रोत्सवाला सुरूवात होत असून त्यादिवशी महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. या दिवशी किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवस यात्रा असते. आयोजकांनी येणाºया भाविकांची राहण्याची, पाण्याची सुविधा केली आहे. शिरपूर- वरवाडे भागातील म्हाळसादेवी मंदिरातही चैत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. महाआरती, पूजा पठण आदी कार्यक्रम आहेत. दक्षिणात्य पध्दतीचे मंदिर असून ते भाविकांना आर्कषित करणारे आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मालपूर- शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे चैत्र शुद्ध चतुर्दशी १८ पासून ग्रामदैवत व्यांघ्रबरी देवीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. अमरावती नदी काठावर तळघरात हे मंदिर आहे. चैत्र शुद्ध चतुर्दशीला येथे ६० दिव्यांची आरती लावण्याची प्रथा आहे. येथे राज्यासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. १८ व २० तारखेला मनोरंजनासाठी लोकनाट्य कार्यक्रम आयोजित केला आहे.
अर्थेला म्हाळसादेवी, उंटावदला सुलाईमाता यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:43 PM
जय्यत तयारी : चैत्र पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम, मालपूरला व्यांघ्रबरीदेवी यात्रा
ठळक मुद्देजय्यत तयारी : चैत्र पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम, मालपूरला व्यांघ्रबरीदेवी यात्रा