आपण फसवणुकीच्या अनेक घटना पाहिल्या असतील. यात फोन करुन बँकेतून बोलतोय सांगून ओटीपी नंबर घेऊन फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. तर ऑनलाईन पैसे उडवल्याच्याही घटना पाहिल्या आहेत. आता एक वेगळ्या पद्धतीने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. फोनवरुन नातवाचा आवाज काढून आजोबांची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसही गोंधळात पडले आहेत.
या आजोबांना सेम आपल्या नातवाचा आवाज आला त्यामुळे त्यांनी लगेच पैसे पाठवले. सध्या एआय तंत्रज्ञानाचा अनेकजण वापर करतात. या गैरवापरही होत असल्याचे आता समोर आले आहे. एक वृद्ध जोडपे एआय घोटाळ्याचे बळी ठरले आहे. या आजोबांचे सुमारे १८ लाखांचे नुकसान झाले आहे. 'एका व्यक्तीचा फोन आला त्याने आपण आपल्या नातवाचा वकील असल्याचा दावा केला होता आणि सांगितले की त्यांचा नातू तुरुंगात आहे आणि त्याला जामिनासाठी पैशांची गरज आहे, असं त्या जोडप्यांनी पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका व्यक्तीचा वृद्ध दाम्पत्यांना कॉल आला होता, जो त्याचा नातू ब्रँडनच्या आवाजाप्रमाणे बोलत होता. स्वत:चा नातू असल्याचे सांगून त्याने सांगितले की, तो तुरुंगात आहे आणि त्याच्याकडे सेलफोन आहे आणि जामिनासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे दाम्पत्यांनी घाबरुन पैसे पाठवले.
रूथ कार्ड आणि तिचे पती ग्रेग ग्रेस यांनी ३,००० कॅनेडियन डॉलर्सची कमाल दैनंदिन मर्यादा काढण्यासाठी त्याच्या बँकेशी संपर्क साधला. नंतर, ते अधिक पैशासाठी दुसर्या शाखेत गेले, पण एका बँक व्यवस्थापकाने त्यांना रोखले. यावेळी त्यांनी असाच कॉल आणखी एका ग्राहकाला आला होता अशी माहिती दिली. अचूक आवाज खरोखर बनावट आहे. यामुळे हे प्रकरण समोर आले.
धक्कादायक! गर्लफ्रेंडला भेटायला गेला, नातेवाईकांना सापडला, मारहाणीत तरुणाचा मृत्यू
दाम्पत्याने सांगितले की,'आम्ही वाईटरित्या अडकलो होतो. आम्ही नातू ब्रँडनशी बोलत आहोत याची आम्हाला खात्री होती. ब्रँडन पर्किन यांनी स्पष्ट केले की जेव्हा त्यांना कळले की त्यांचा नातू अडचणीत आहे, तेव्हा त्यांच्या आजोबांनी रोख रक्कम गोळा केली आणि स्कॅमरना बिटकॉइनद्वारे पैसे पाठवले. पर्किनने त्याचे व्हिडिओ YouTube वर शेअर केले आहेत, त्यामुळे घोटाळेबाजांनी त्याच्यासारखा आवाज करण्यासाठी एआय टूल्सचा वापर कसा केला हे स्पष्ट नाही.