Arun Gawli : डॅडीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर; नागपूर खंडपीठाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 07:29 PM2021-08-11T19:29:37+5:302021-08-11T19:30:24+5:30
Arun Gawli : उच्च न्यायालयाचा निर्णय : नागपुरात भोगत आहे जन्मठेप
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला कुटुंबीयांना भेटण्यासाठी २८ दिवसांची संचित रजा (फर्लो) मंजूर केली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
गवळीने रजा मिळण्यासाठी सुरुवातीला कारागृह प्रशासनाकडे अर्ज सादर केला होता. तो अर्ज नामंजूर झाल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले. परिणामी, यावेळीही रजा नाकारता येणार नाही, असे त्याचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने यासह विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता त्याला दिलासा दिला. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे अॅड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.
इंदूरपासून पोलिसांनी केला पाठलाग; सिगारेट ओढण्यासाठी 'तो' बाल्कनीत आला, अन्...https://t.co/b8vd6dIvEQ
— Lokmat (@MiLOKMAT) August 11, 2021