मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 04:00 PM2020-05-22T16:00:14+5:302020-05-22T16:01:45+5:30
गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
मुंबई - नुकतेच लॉकडाऊनमध्ये कुख्यात गुंड अरुण गवळीच्या (डॅडी) मुलीचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर आता गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. न्यायालयाने अरुण गवळीला नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात जाऊन सरेंडर करण्याचा आदेश दिला आहे.
अरुण गवळीने पॅरोल वाढवून देण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान, आपण कोणतंही गैरकृत्य त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने चांगली वर्तवणूक किंवा नियमांचं उल्लंघन न केल्याच्या धर्तीवर पॅरोल वाढवला जाऊ शकत नाही असे बजावले. तसेच पॅरोल वाढवण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचे खंडपीठाने नमूद केले. यामुळे अरुण गवळीला पुन्हा कारागृहात परतावं लागणार आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी ते नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणामुळे गवळीला सुरुवातीला ४५ दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार त्याला २७ एप्रिल रोजी कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. परंतु, लॉकडाउनमुळे उच्च न्यायालयाने त्याला पहिल्यांदा १० मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर लॉकडाउन लांबले. परिणामी, न्यायालयाने गवळीच्या पॅरोलमध्ये दुसऱ्यांदा वाढ केली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
मुंबई - कुख्यात गुंड अरुण गवळीला तळोजा कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश, पॅरोलमध्ये वाढ करण्यास नकार https://www.lokmat.comhttps://www.lokmat.com/
— Lokmat (@MiLOKMAT) May 22, 2020
लॉकडाऊन लांबल्यामुळे अरुण गवळीला पुन्हा पॅरोलवाढ; २४ मेपर्यंत मुदतवाढ
Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू
विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न
धक्कादायक! मुलाला 'क्राईम सिरीअल' दाखवत तयार केले; मातेने तिहेरी हत्याकांड घडवलं
लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...