ठाणे - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी २८ ऑगस्ट रोजी ठाण्यातील चरई परिसरातील शिनॉय इमारतीत राहणाऱ्या अरुण परेरा यांना पुणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. मात्र काल दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अरुण परेरा ठाण्यातील चरई भागातील शिनॉय इमारतीतील आपल्या राहत्या घरी आज सकाळी ६. वाजताच्या दरम्यान परतला आहे. मात्र, त्याआधी परेराने नौपाडा पोलिस ठाण्यात जाऊन हजेरी लावली नंतर त्याला पुणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी घरी नेले. परेरासह पाच जणांना पुणे पोलीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीत सर्व पाचही आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार अरुण परेराला ठाण्यात आज आणण्यात आले. दरम्यान, आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परेरा यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
अरुण परेरा ठाण्यात राहत्या घरी परतला, जितेंद्र आव्हाडांनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 3:22 PM