शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

Aryan Khan: आर्यन खानकडे कुठलेच ड्रग्स सापडले नाही?, SIT सूत्रांचा दावा; समीर वानखेडे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 9:17 AM

या चौकशीत आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हते त्यामुळे त्याचा फोन घेऊन चॅट तपासण्याची गरज नव्हती असं SIT चौकशीतून पुढे आल्याचं एका वृत्तपत्राने म्हटलं आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला(Aryan Khan) गेल्यावर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं(NCB) ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. एनसीबीनं क्रूझवर टाकलेल्या छाप्यात आर्यनला ताब्यात घेतले होते. त्यानंतर जवळपास ३ आठवडे आर्यन खान हा आर्थर रोडच्या तुरुंगात होता. हा काळ शाहरुखसाठी खूप खडतर होता. त्यानंतर या प्रकरणावरुन बराच वाद निर्माण झाला. त्यामुळे NCB नं SIT नेमली होती. त्यांच्या तपासात आर्यनविरोधात कुठलाच पुरावा आढळला नसल्याचं समोर आलं आहे.

आर्यन खान हा ड्रग्सच्या मोठा कटाचा किंवा सिंडिकेटचा भाग असल्याचा कोणताही पुरावा एसआयटीला आढळला नाही. क्रूझवरील छाप्यात अनेक अनियमितता झाली होती. त्या दरम्यान आर्यनला अटक करण्यात आली होती. आर्यनच्या अटकेनंतर तत्कालीन NCB अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्याविरोधात संशयाचं वातावरण निर्माण झालं. मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत क्रूझवरील छाप्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यानंतर या प्रकरणाची SIT चौकशी लावण्यात आली.

या चौकशीत आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हते त्यामुळे त्याचा फोन घेऊन चॅट तपासण्याची गरज नव्हती. चॅटमधूनही तो आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिडिंकेटचा भाग असल्याचं सिद्ध होत नाही. त्याचसोबत NCB च्या नियमानुसार छापा टाकताना व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला नव्हता. गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्स सिंगल रिकव्हरी म्हणून नोंदवले होते असं SIT चौकशीतून समोर आलं आहे. याबाबत हिंदुस्तान टाईम्सनं अधिकृत सूत्रांनुसार बातमी दिली आहे.

तसेच SIT चा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. या चौकशीचा अंतिम अहवाल येण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात असं NCB चे महासंचालक एस.एन प्रधान यांनी सांगितले आहे. कुठल्याही निर्णयापूर्वी कायदेशीर बाबी तपासून घेतल्या जातील. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या चौकशीतून समीर वानखेडे यांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. समीर वानखेडे यांनी मागील वर्षी २ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्यातून क्रूझवरुन १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम मेफेड्रोन, २१ ग्रॅम गांजा तसेच दीड लाखांपर्यंत रोकड जप्त केली होती.

चुकीची बातमी असल्याचा समीर वानखेडेंचा दावा

SIT चौकशीच्या अहवालाबाबत जी बातमी आलीय ती चुकीची आहे. २ कोर्टाने आर्यनचा जामीन फेटाळला होता. त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कारवाई चुकीची होती असं म्हणता येणार नाही. गठित केलेल्या एसआयटीचा तपास हा भ्रष्टाचाराच्या दृष्टीने आहे की प्रकरणाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने हे न्यायालय ठरवेल. झोनल डायरेक्टरला कुणालाही अटक करण्याचे अधिकार नाहीत. त्याचसोबत काही राजकीय आणि सूडबुद्धीने माझ्यावर आरोप करण्यात आले जे हायकोर्टानेही अनेकदा मान्य केले. तसेच मुंबई पोलिसांनीही खोटे आरोप असल्याबाबत क्लोजर रिपोर्ट दिला आहे असं समीर वानखेडेंनी म्हटलं.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थ