NCB वर करण्यात येणाऱ्या आरोपांशी आमचा संबंध नाही; कोणताही पैशाचा व्यवहार झालेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:07 PM2021-10-26T15:07:15+5:302021-10-26T15:15:19+5:30

Aryan Khan Bail : आर्यन खानच्या वकिलांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र केले दाखल

Aryan khan says in statement to court no connect with payoff allegations | NCB वर करण्यात येणाऱ्या आरोपांशी आमचा संबंध नाही; कोणताही पैशाचा व्यवहार झालेला नाही

NCB वर करण्यात येणाऱ्या आरोपांशी आमचा संबंध नाही; कोणताही पैशाचा व्यवहार झालेला नाही

Next
ठळक मुद्देसुनावणीदरम्यान आर्यन खानच्या वतीने एनसीबीवरील व्यवहारांच्या आरोपांशी आपला काहीही संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्राचा आणि त्यानं केलेल्या आरोपांचा जामीनाशी काहीही संबंध नसल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली. आर्यन खानच्या वतीने न्यायालयात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे, या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रामध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी त्याच्या बाजूने कोणताही व्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. हा सर्व राजकीय लोक आणि एनसीबीमधील मामला आहे. तसेच प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्राचा आणि त्यानं केलेल्या आरोपांचा जामीनाशी काहीही संबंध नसल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

सुनावणीदरम्यान आर्यन खानच्या वतीने एनसीबीवरील व्यवहारांच्या आरोपांशी आपला काहीही संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. प्रभाकर साईल किंवा किरण गोसावी यांनाही ते ओळखत नसल्याचेही सांगण्यात आले आहे. आर्यनच्या वतीने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रभाकर साईल माहीत नाही किंवा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचेही म्हटले आहे. हे वेगळे प्रकरण आहे. मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कोणताही आरोप केलेला नाही.


आर्यन खानच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीच्या अधिकार्‍यांशी त्यांच्या बाजूने कोणताही व्यवहार झाला नसल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. हा सगळा राजकीय लोक आणि एनसीबी यांच्यातील मामला आहे. प्रतिज्ञापत्रात आर्यन खानने पुनरुच्चार केला आहे की, त्याच्याकडून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आले नाही किंवा त्याने ते सेवन केले नाही. क्रूझ टर्मिनलवर त्याच्या उपस्थितीदरम्यान याचा कोणताही पुरावा सापडला नाही.


आर्यन खानच्या वतीने या प्रतिज्ञापत्रात या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोप बाजूला ठेवून गुणवत्तेच्या आधारे त्याच्या जामीन अर्जावर निर्णय घेण्यात यावा, असे म्हटले आहे.  त्याचवेळी आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीने न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. एनसीबीने जामीन अर्जाला तीव्र विरोध केला आहे, एनसीबीने म्हटले आहे की, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने पंच साक्षीदारावर प्रभाव टाकल्याचे दिसते. जामीन अर्ज फेटाळण्यासाठी केवळ ही एक गोष्ट कारण ठरू शकते.

 

 

 

Read in English

Web Title: Aryan khan says in statement to court no connect with payoff allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.