शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

Aryan Khan: गूढ वाढले! आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा तो व्यक्ती कोण? NCB म्हणते संबंध नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 7:09 PM

Aryan Khan selfie in cruise rave party: आर्यन खानला (Aryan Khan) स्पॉट करताना एका व्यक्तीने त्याच्यासोबत सेल्फी काढला होता. हाच व्यक्ती आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर नेताना दिसत होता.

गोव्याला निघालेल्या क्रूझवरील रेव्ह पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्री छापेमारी केली. यामध्ये बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सगळीकडे या ऑपरेशनची चर्चा असताना एका सेल्फीनेही सोशल मीडियावर धूम माजविली होती. एनसीबीने कारवाई आधी त्या पार्टीमध्ये आपली माणसे पेरली होती, हा तो अधिकारी होता. ज्याने डमी म्हणून रेव्ह पार्टीत प्रवेश केला आणि भांडाफोड केली, असे बोलले जात होते. यावर एनसीबीने खुलासा केला आहे. (Narcotics Control Bureau (NCB) categorically clarifies that the man in this picture with Aryan Khan is not an officer or employee of NCB)

आर्यन खानला (Aryan Khan) स्पॉट करताना एका व्यक्तीने त्याच्यासोबत सेल्फी काढला होता. हाच व्यक्ती आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर नेताना दिसत होता. यामुळे साऱ्यांनी तो एनसीबीचा अधिकारी किंवा अंडरकव्हर अधिकारी असेल असा कयास बांधला होता. परंतू एनसीबीने त्या सेल्फीमधील जो व्यक्ती आहे तो एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

यामुळे हा व्यक्ती कोण होता, तिथे काय करत होता आणि आर्यन खानला नेण्यात त्याची काय भूमिका होती याबाबत तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत. तो जर एनसीबीचा अधिकारी नव्हता तर तो नेमका कोण होता, तो त्याच रेव्ह पार्टीत सहभागी झाला होता का, आणि त्याने संधीचा फायदा घेऊन पळ काढला का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

आतापर्यंत नेमके काय झाले...मुंबई ते गोवा आणि परत मुंबई अशा क्रूझवरील रेव्ह पार्टीवर एनसीबीने छापेमारी केली. यामध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा सापडला आहे. त्याला अटक झाली असून त्याच्यासोबत अनेक असे लोक सापडले आहेत जे बॉलीवूड घराण्यांशी थेट संबंधीत आहेत. हिरो, हिरोईनींची मुले, नातेवाईक यामध्ये सापडले आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्या मोबाईलमधून आणखी काही कनेक्शन उघड होत असल्याचे या सूत्रांनी सांगितले आहे. दिवंगत अभिनेता सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये बॉलिवूड कनेक्शन समोर येत आहे. चौकशीवेळी केवळ बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या मुलांचीच नावे नाहीत तर त्या आधी इतर रेव्ह पार्ट्या किंवा ड्रग प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्यांची नावेही समोर आली आहेत. सुरुवातीच्या तपासात संशयाची सुई मुंबईच नाही तर गुरुग्राम आणि दिल्लीकडे वळली आहे. या क्रूझवर पार्टीचे आयोजन करण्यामागे बटाटा गँगचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आर्यन खानसह मुनमुन, अरबाज अशा ८ जणांना अटक करण्यात आली आहे. (who is the man with Aryan Khan selfie? NCB says he is not officer or employee)

टॅग्स :Mumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीAryan Khanआर्यन खानDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो