पनवेल - माझ्या आईचा खून पोलिसांनीच केला आहे. मी सहा वर्षांची असताना माझी आई सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे - गोरे हिचा मृतदेह मिळविण्यासाठी व खुन्याला अटक करण्यासाठी मुंबईला फेऱ्या मारत आहे. माझ्यासह माझे बाबा सतत माझ्या आईच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावे यासाठी सतत मुंबईला फेऱ्या मारत आहेत. पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसभर त्यांच्या दालनाबाहेर बसवून आम्हाला भेट दिली नाही. शिवशाहीचे मुख्यंमत्री म्हणून उद्धव ठाकरे आम्हाला नक्कीच न्याय देतील असे पत्र अश्विनी बिद्रे - गोरे यांच्या दहावर्षीय कन्या सिद्धी गोरे हिने मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.
अनेक वेळा प्रयत्न करून देखील आईचा मृतदेह आम्हाला मिळाला नाहीत. पैसे नसल्यामुळे मृतदेह शोधला गेला नाही.पोलीस अधिकारी संगीत अल्फान्सो मॅडममुळे आईची हत्या करणारे आरोपी तुरुंगात आहेत. माझे बाबा हा खटला लढण्यासाठी वारंवार मुंबईला येत असतात. अशावेळी त्यांच्या जीवाला देखील पोलिसांपासून धोका निर्माण झाला आहे. मुंबईला जाताना ते नेहमी रात्री घराबाहेर पडतात. माझे बाबा माझ्यासाठी सर्वस्वी आहेत. बाबांना पोलीसच मारतील त्यामुळे माझ्या बाबांना मला परत करा . माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्या. आरोपींना लवकरात लवकर फाशी द्या . अशी भावनिक साद चिमुकल्या सिद्धी गोरे हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे.
अश्विनी बिद्रे हत्याकांड खटला दुसऱ्या न्यायमूर्तीकडे
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : सरकारी वकील घरत यांच्या मानधनात वाढ
हातकणंगले येथील एका शाळेमध्ये सूची सध्या इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. तिने आठवडाभरापुर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याला भेट मिळावी अशी विनंती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आईच्या खून प्रकरणात खूप मदत केली आहे.त्यांचे मी आभार मानते. मला शिवशाहीच्या मुख्यमंत्र्यांना भेटायची ईच्छा आहे. आमच्यावर झालेल्या अन्याय सांगण्यासाठी मला तुम्हाला भेटायचे आहे. माझे म्हणणे ऐकाल ना ... अशा स्वरूपाचे पत्र सिद्धीने मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.