पनवेल - अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात सुरु आहे.न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्याकडे सुरु असलेला खटला आता न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या न्यायालयात चालणार आहे. न्यायमूर्ती राजेश अस्मर व आरोपीचे वकील विशाल भानुशाली यांची ज्युनियरशिप एकाच ठिकाणी झाल्याचे सांगत अस्मर यांच्याकडे साक्ष नोंदविण्यास अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी विरोध दर्शविला होता. तसेच संबंधित खटला न्यायमूर्ती अस्मर यांच्याकडून काढून घेण्याची मागणी गोरे यांनी चीफ जस्टीस ऑफ इंडिया यांच्याकडे केली होती.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : सरकारी वकील घरत यांच्या मानधनात वाढ
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण, प्रदीप घरत वकीलपत्र सोडण्याच्या तयारीत