बीजिंग - चीनमधील पोलिसांनी यांगत्सी नदीत अवैध मासेमारीशी संबंधित २२७८ गुन्हेगारी प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरूवातीपासूनच ३९६६ संशयितांना बेकायदेशीर मासेमारीसाठी अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने (एमपीएस) शुक्रवारी सांगितले की, या कारवाईत ९३० फिशिंग बोट्स, फिशिंग गीयरच्या १२६००० युनिट्स, ११०००० किलोपेक्षा जास्त जाळे जप्त करण्यात आले आहेत.सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सार्वजनिक सुरक्षा उपमंत्री लिन रुई म्हणाले की, पोलिस भूमिगत औद्योगिक साखळी, वाहतूक आणि अवैध मासेमारीसंदर्भातील व्यावसायिक कामे कमी करण्यासाठी प्रयत्न करत राहतील. एमपीएस आणि कृषी व ग्रामीण व्यवहार मंत्रालयाने गेल्या जूनमध्ये सुरू केलेल्या या-वर्षाच्या मोहिमेचे उद्दीष्ट देशातील सर्वात लांब नदीचे संरक्षण करणे आहे. यांगत्झी नदीवरील मासेमारीवर बंदी आहे.
चीनच्या नदीत मच्छिमारी करायला जाणं पडलं महागात; तब्बल ३ हजार ९६६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 3:16 PM
Asia 3966 arrested for illegal fishing - यांगत्झी नदीवरील मासेमारीवर बंदी आहे.
ठळक मुद्दे हेच कारण आहे की, या प्रमुख नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी आणि जनावरांना पुन्हा वाढू देण्याकरिता चीन सरकारने १० वर्षांची कडक बंदी घातली आहे.