सिंगरौली - मध्य प्रदेश येथे असलेल्या सिंगरौली जिल्ह्यातून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. सिंगरौलीत अंधश्रद्धेमुळे आदिवासी तरूणाने एएसआयचा कान चावला आहे. तरुण म्हणाला की, भूताने कच्चे मास खाण्यास सांगितले होते, म्हणून त्याने तसे केले. वास्तविक परस्पर जुन्या भांडणाची माहिती मिळताच एएसआय इंद्रराज मिश्रा घटनास्थळी पोहोचले. या दरम्यान आदिवासी युवकाने दाताने कान चावून तोडला आणि विहिरीत उडी मारली.जखमी एसआयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अटक आरोपीने सांगितले की, भूताने त्याला कच्चे मास खाण्यास भाग पाडले आहे, त्यामुळे एएसआयचे कान कापून खाल्ला. संपूर्ण प्रकरण सिंगरौली जिल्ह्यातील आदिवासीबहुल सराय पोलिस स्टेशन परिसरातील टिंगुडी चौकीचा आहे. दारूच्या नशेत काही आदिवासी ग्रामस्थांमध्ये भांडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच एएसआय इंद्रराज मिश्रा आपल्या पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी रवाना झाले.
घटनास्थळी भेट दिल्यानंतर आदिवासी भांडत होते. बर्याच लोकांना समजूत घालून शांत केले गेले. या दरम्यान आरोपी देवधरम सिंह देव दारूच्या नशेत रस्त्यावर पडला होता. एएसआय त्याच्या जवळ येताच आरोपीने एएसआय इंद्रराज मिश्राचा कान दातांनी कापून विहिरीत उडी मारली.पोलिसांनी माणुसकी दाखवत आरोपीला विहिरीतून बाहेर काढले आणि सराय येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याचवेळी प्रकृती गंभीर झाल्यानंतर एएसआयला रेवा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले, तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी आरोपीने भूताच्या सांगण्यावरून मी कच्चे मास खाल्ल्याचे सांगितले.