शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

आई-वडिलांकडे तक्रार केल्याचा राग; 40 विद्यार्थ्यांचा गरोदर शिक्षिकेवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 9:03 PM

याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, 22 विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.

गुवाहाटी: अनेकदा विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी गैरवर्तन केल्याच्या बातम्या येत असतात. असाच एक प्रकार आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यातून समोर आला आहे. पण, या वेळेस विद्यार्थ्यांनी हद्दच केली. विद्यार्थ्यांच्या टोळक्याने 5 महिन्यांच्या गरोदर शिक्षिकेवर हल्ला केला. याचे कारण म्हणजे, शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अभ्यास करत नसल्याची तक्रार केली होती.

विद्यार्थी शाळेतून निलंबितया धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 22 विद्यार्थ्यांना शाळेतून निलंबित करण्यात आले आहे. हे प्रकरण जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित आहे. शाळेचे उपप्राचार्य रतीश कुमार यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. शाळेत शिक्षक पालकांची बैठक होती, विद्यार्थ्यांचे पालक आले होते. यादरम्यान 22 विद्यार्थ्यांच्या खराब कामगिरीची तक्रार इतिहासाच्या शिक्षिकेने त्यांच्या पालकांकडे केली.

40-50 विद्यार्थ्यांनी घेराव घातलारविवारी संध्याकाळी सुमारे 40-50 विद्यार्थ्यांच्या जमावाने पाच महिन्यांच्या गरोदर शिक्षिकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुख्याध्यापक रतीश कुमार यांनी सांगितले की, जेव्हा शिक्षिकेला विद्यार्थ्यांनी घेरले तेव्हा ती बेशुद्ध पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. नंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. 

सर्व 10वी आणि 12वीचे विद्यार्थीदोन विद्यार्थी मुख्य दोषी होते, त्यांनी 40-50 विद्यार्थी एकत्र केले. बहुतेक विद्यार्थी इयत्ता दहावी आणि बारावीचे होते. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकाला घेरले आणि तिच्यावर अश्लील शेरेबाजी केली, तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दिब्रुगडचे जिल्हा दंडाधिकारी विश्वजित पेगू यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :AssamआसामCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीWomenमहिला