गुवाहाटी: असामचा वीरप्पन (Assam's Veerappan Mangin Khalhau) नावाने ओळखलाजाणारा वांटेड गुन्हेगार मांगिन खालहाउ(Mangin Khalhau) मारला गेल्या. असाम पोलिसांनी टोळीच्या अंतर्गत वादातून खालहाउची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याच्या संघटनेचे अनेक गुन्हेगार यापूर्वीच चकमकीत मारले गेलेत. तो सध्या टोळीतील एकमेव मोठा गुन्हेगार होता. चंदन तस्कर वीरप्पन प्रमाणेच खालहाउदेखील मौल्यवान लाकडांची तस्करी करायचा.
यूनायटेड पीपुल्स रिवोल्यूशनरी फ्रंट (UPRF) च्या स्वयंघोषित कमांडर मांगिन खालहाउ शनिवारी किंवा रविवारी रात्री मारला गेल्याची शक्यता आहे. पोलिसांचे म्हणने आहे की, असामच्या कारबी आंगलोंग जिल्ह्यातील डोगंरांमध्ये झालेल्या अंतर्गत वादात साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांना रविवारी त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांना त्याच्या शरीरावर गोळीच्या जखमा दिसल्या. खालहाउच्या मृत्यूनंतर ही टोळी नेतृत्वहीन झाली आहे.
मांगिनची संघटना UPRF मधील बहुतेक सदस्य कुकी समाजातील आहेत. हा समाज असामच्या दक्षिणेकडील पर्वतरांग आणि सिंघासन हिल्सच्या परिसरात सक्रीय आहे. चीनची असॉल्ट रायफल म्यानमारमधून मिळवल्यानंतर हा टोळीची दहशत वाढली होती. परंतु, मागच्या वर्षी या संघटनेच्या अनेक सदस्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे संघटना कमकुवत पडली आहे.