समस्तीपूर : जिल्ह्यातील विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मऊ गावात एका कुटुंबातील घरमालक, त्याची आई, पत्नी आणि दोन निष्पाप मुलांनी सामूहिक आत्महत्या केल्यानंतर त्या मृतदेहांचे समस्तीपूर सदर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तेथे वैद्यकीय मंडळाच्या डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन करून रविवारी रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गंगेची उपनदी वाया नदीच्या काठावर त्या मृतदेहांवर रविवारी रात्री उशिरा नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रशासकीय देखरेखीखाली अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घरातून बाहेर पडलेल्या पाच जणांची अंत्ययात्रा पाहताच गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.
एकाच कुटुंबातील पाचही सदस्यांची अंत्ययात्रा एकत्र घरातून बाहेर पडले, तेव्हा सर्वांचेच हृदय हेलावून गेले, त्यामुळे नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले होते. त्याचवेळी उपस्थित स्थनिकांचे डोळे पाणावले होते. कुटुंब प्रमुख असलेल्या मनोजच्या या निर्णयाबाबत सर्वजण आपापली बाजू मांडत होते. मनोज यांचे धाकटे जावई खुसरुपूर येथील रहिवासी आशिष मिश्रा यांनी पाचही मृतदेहांना मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित शेकडो लोकांचे डोळे पाणावले. सीओ अजय कुमार, एसएचओ प्रसंजय कुमार आदी यावेळी उपस्थित होते.विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जणांच्या आत्महत्येने सावकारांची दहशत चव्हाट्यावर येत आहे. तीन लाखांच्या कर्जाच्या व्याजासह 18 लाखांची मागणी सावकाराने केली होती. यासाठी कुटुंबाला त्रास दिला जात होता. मृत मनोजची मोठी मुलगी काजल हिने पोलिसांना सांगितले की, माझ्या लग्नात आजोबांनी गावातील एका व्यक्तीकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. तो व्याज जोडून माझ्या आजोबा आणि वडिलांकडे १८ लाख रुपयांची मागणी करत होता. व्याज घेणारा रोज घरी येऊन शिवीगाळ करत असे. याला कंटाळून दादाने आधीच आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी एक कर्जदार वडिलांची ऑटो रिक्षा घेऊन गेला होता. त्यामुळे घरची अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. वडिलांकडे दोन खोल्यांच्या झोपडीशिवाय काहीच नव्हते. घराजवळील एका छोट्या मोकळ्या जागेवरही लोकांनी कब्जा केला आहे.