Rajasthan Crime News : राजस्थानच्या बाडमेरमध्ये केवळ 12 मिनिटात पाच चोरांनी एटीएम अख्खं एटीएम लंपास केलं. या एटीएममध्ये 38 लाख रूपये होते. ही संपूर्ण घटना बाजूच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या घटनेनंतर पोलिसांनी हालचाल सुरू केली आणि ठिकठिकाणी नाकाबंदी केली.
चोरांनी दुकानाचं शटर तोडलं आणि एटीएम मशीन घेऊन फरार झाले. असं सांगितलं जात आहे की, मंगळवारी सायंकाळी कंपनीने एटीएममध्ये 38 लाख रूपये टाकले होते. सकाळी गार्ड आला तेव्हा त्याला दिसलं की, दुकानाचं शटर उघडं आहे. त्याने लगेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून चोरांचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनुसार, 5 मास्क लावलेले चोर बलेरो गाडीने आले होते. शटर तोडल्यावर त्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही तोडले. त्यानंतर बलेरोच्या हुकने लोखंडी चेनमध्ये बांधून एटीएम मशीन घेऊन गेले. असा अंदाज लावला जात आहे की, चोरांना या ठिकाणाची चांगली माहिती होती. तेव्हाच ते केवळ 12 मिनिटात एटीएम उचलून घेऊन गेले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एटीएम चोर बलेरो गाडीने आले होते. पोलीस अजूनही एटीएम आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहेत. चोरांचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे. लवकरच चोरांना अटक केली जाईल.