शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

एटीएसची कारवाई; अवैध टेलिफोन एक्स्चेंजच्या म्होरक्याला हैदराबादमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 13:44 IST

अद्ययावत उपकरणांचा वापर

ठळक मुद्देरफीक अन्सार बादशाह अल्लातूर असे आरोपीचे नाव आहे. ९ तारखेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.अवैध टेलिफोन एक्स्चेंजचे रॅकेट उद्ध्वस्त केले.

मुंबई - अवैध टेलिफोन एक्स्चेंजच्या म्होरक्याला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हैदराबादमधून बेड्या ठोकल्या. रफीक अन्सार बादशाह अल्लातूर असे आरोपीचे नाव आहे. या कारवाईत वापर झालेले अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणेही एटीएसच्या हाती लागली आहेत.अन्सार हा एटीएससोबतच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या २०१७ सालच्या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी होता. एटीएसने ८ ऑगस्ट रोजी गोवंडीतील शिवाजीनगरसोबतच मुंबईतील मशीद बंदर, डोंगरी आणि वरळी तर, कल्याण आणि नवीन पनवेलमध्ये छापेमारी करून नाझीम खान (२९), फैजल बाटलीवाला उर्फ अकबर (४०), समीर दरवेज (३०), हुसैन सय्यद (३९), मंदार आचरेकर (३६), सिब्तेन मर्चंट (३३) आणि इम्तियाज शेख (३८) या सात जणांना बेड्या ठोकत, अवैध टेलिफोन एक्स्चेंजचे रॅकेट उद्ध्वस्त केले. त्यापाठोपाठ या टोळीच्या म्होरक्याला हैदराबाद येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ९ तारखेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

 

एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि बीएसएनएल कंपन्यांची एकूण दोन हजारांहून जास्त सिमकार्ड एटीएसने जप्त केली आहेत.आरोपींनी ही सिमकार्ड कशी व कोणाकडून मिळवली, याबाबत एटीएस अधिक तपास करीत आहेत. यात संबंधित सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का, यादृष्टीनेही एटीएस तपास करीत आहे.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिस