ठळक मुद्देतब्ब्ल चार तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. चौकशीदरम्यान एटीएसने त्यांचा पासपोर्टसह इतर कागदपत्रांची पडताळणी केली आणि नंतर त्यांना सोडून देण्यात आलं.
मुंबई - मालाड येथील एका मदरशाच्या मौलानाची दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी चौकशी केली.एटीएसच्या अधिकाऱ्यांना मौलानाच्या मोबाईलशी संबंधित काही गोष्टी संशयास्पद आढळून आल्याने एटीएसने आज सकाळी ९ वाजल्यापासून चारकोप येथे मौलाना वसीम अहमद काझमी यांची चौकशी केली. तब्ब्ल चार तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले.
मालाड येथील मालवणी परिसरात भाबरेकर नगरमधील आंबोजवाडी येथे वसीम हे राहत असून ते मालवणीत एका मदरश्याचे मौलाना आहेत. काही संशयावरून एटीएसने त्यांची चौकशी केली असून चौकशीदरम्यान एटीएसने त्यांचा पासपोर्टसह इतर कागदपत्रांची पडताळणी केली आणि नंतर त्यांना सोडून देण्यात आलं.