मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी जालन्यातून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. गणेश कपाळे याला औरंगाबाद एटीएसनं ताब्यात घेतले आहे. एटीएसने अटक केलेल्या आरोपी श्रीकांत पांगरकर याचा गणेश मित्र असल्याचं समोर आलं आहे. आज सकाळी शनी मंदिर भागातून पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतले. तो डीटीपी ऑपरेटर असून त्याचं जालन्यात झेरॉक्स आणि स्टेशनरीचं दुकान आहे. नालासोपारा स्फोटकं प्रकरणीही गणेशवर संशय आहे. गणेशच्या दुकानातून कॉम्प्युटर आणि हार्ड डिक्स पोलिसांनी हस्तगत केली आहे.
याआधी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या प्रकरणात साकळी, ता.यावल येथील विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी (वय २२) या तरुणाला गुरुवारी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. दाभोळकरांच्या हत्येत वापरण्यात आलेले वाहन साकळी येथील असल्याचे संशय आहे. त्याची एटीएस चौकशी करत आहे. विशाल सूर्यवंशी हा तरुण कर्की ता. मुक्ताईनगर येथील मुळ रहिवाशी असून त्याच्या वडीलाचे निधन झाल्यानंतर तो आई व आजीसोबत साकळी येथे मामाकडे राहण्यास आला होता.प्लॉट भागात स्वत:चे घर आहे. त्याचे दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे. गेल्या ८-१० वर्षापासून तो साकळी येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती.
नरेंद्र दाभोलरांच्या हत्या प्रकरणात ‘एटीएस’ने जळगावच्या तरुणास घेतले ताब्यात