उल्हासनगर : शहरातील १७ सेक्शन विभागात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या उचलताना पोलीस व हेमंत यांच्यात बाचाबाची झाली. गाडीचे कागदपत्र न दाखविता रागाच्या भरात हेमंत याने पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगरात कॅम्प नं-३ परिसरातील १७ सेक्शन भागात मोबाईलचे मोठे मार्केट असून शहारा बाहेरील शेकडो नागरिक खरेदीसाठी येतात. त्यामुळे परिसरात वाहनांची व नागरिकांची कायमची वर्दळ असते. शहर वाहतूक पोलीस नो पार्किंग व वाहतुकीस अडथळा निर्माण केलेल्या गाडीवर कारवाई करीत असल्याने वाहतूक कोंडीला ऐन दिवाळीत पूर्ण विराम मिळाला. मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान वाहतूक पोलीस वाहतुकीस नो पार्किंग मधील व रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या उचलत होत्या. त्यावेळी हेमंत पोपली यांची रस्त्यावर पार्किंग केलेली ऍक्टिव्ह गाडी पोलिसांनी उचलली. त्यावेळी हेमंत पोपली यांनी विरोध करून पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना शिवीगाळ करून मारहाण केली. शहर वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना झालेल्या मारहाणीचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. त्यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वाहतूक पोलिसांना यापूर्वीही मारहाण झाल्याच्या घटना झाल्या आहेत. मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत.
खाकीवर हल्ला! कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसाला शिवीगाळ अन् मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 5:29 PM
Attack on Traffic Police : याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देउल्हासनगरात कॅम्प नं-३ परिसरातील १७ सेक्शन भागात मोबाईलचे मोठे मार्केट असून शहारा बाहेरील शेकडो नागरिक खरेदीसाठी येतात.