टेंभुर्णी : मारहाण प्रकरणातील संशयित आरोपींना कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विचारणा करण्यासाठी गेलेल्या टेंभुर्णी पोलीस ठाण्याचा पथकाला मारहाण, दमदाटी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच गाडीवर दगडफेक करून हल्ला केल्याप्रकरणी ११ जणांचा विरोधात शनिवारी रात्री उशीरा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबवे ता. माढा येथील सुधीर उर्फ भैय्या अशोक खटके वय ३० याने सोमनाथ खटके याच्या टपरीवर लाईट जोड असे का.! सांंगितले म्हणून चिडून जाऊन अकलूज रोडवर शेवरे येथून सुधीर खटके याला उचलून गाडीत नेऊन शिराळ (ता. माढा) येथे तलवार, लोखंडी रॉड, केंबल वायर, 'पीव्हीसी. पाईप, चॉकअपसर पाईप याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सात जणांचा विरोधात सुधीर खटके याने फिर्याद दिली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, पोलीस कर्मचारी विनोद साठे, संदीप गिरमकर आदी कर्मचारी टेंभुर्णी येथील भवानी नगर येथे राहत असलेल्या राजाभाऊ खटके यांच्या घरी गेले होते.
यावेळी संशयित आरोपींनी पोलीस उपनिरीक्षक यांना शिवीगाळ करून दमदाटी केली तर पोलीस नाईक विनोद साठे यांना अंगावर धाऊन जाऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राजाभाऊ हंबीरराव खटके रा. भवानीनगर टेंभुर्णी ता. माढा, सधुकर हंबीरराब खटके, सुधाकर हंबीरराव खटके, विकास वामन खटके, शोभराज मधुकर खटके, सौरभ सुधाकर खटके, ओंकार समाधान खटके, गणेश सुनिल खटके, राजवर्धन राजाभाऊ खटके, आनंद समाधान खटके सर्व रा. तांबवे ता. माढा, उमेश भोळे रा. लवंग ता. माळशिरस यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118 (2), 137 (2), 126(2), 352, 351(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 324(4), 118 (1), संह, महाराष्ट्र पोलीस कलम 135 प्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.