शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मित्रासोबत कपडे खरेदी करण्यास गेलेल्या तडीपार गुंडावर हल्ला, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 1:34 PM

Attack on Gangster : गंभीर जंखमी झालेल्या गुंडावर क्रीटिकेअर रूग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देतडीपार गुंड समाधान निकम यांच्यावर हल्ला होऊन उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर : मित्रासोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या तडीपार गुंडावार कॅम्प नं-२ परिसरात गुरवारी दुपारी अड्डीच वाजता तिघांनी जुन्या भांडणाच्या रागातून चाकू हल्ला केला. गंभीर जंखमी झालेल्या गुंडावर क्रीटिकेअर रूग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी उल्हासनगरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.उल्हासनगर कॅम्प नं-१ तेजुमल चक्की समाधान निकम याला मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, रायगड जिल्हातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार शिक्षेचा भंग करून तो शहरात सर्रासपणे राहत असल्याचे उघड झाले. गुरवारी दुपारी अड्डीच वाजण्याच्या दरम्यान मित्र राहुल वंजारी याच्या सोबत कॅम्प नं-२ परिसरात कपडे खरेदी करण्यासाठी गेला होता. मार्केट मधून बाहेर आल्यानंतर जुन्या भांडणाच्या रागातून पियूष, रोहित व नारायण घरटे यांनी जुन्या भांडणाच्या रागातून समाधान निकम याला शिवीगाळ, मारहाण करून चाकू हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या निकम याला शहरातील क्रीटीकेअर रूग्णालयात उपचारसाठी भरती करण्यात आले. राहुल वंजारी याच्या तक्रारी वरून तिघा विरोधात उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.तडीपार गुंड समाधान निकम यांच्यावर हल्ला होऊन उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची माहिती पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी यांना समजल्यावर क्रीटीकेअर रूग्णालयात उपचार घेत असलेल्या समाधान निकम यांच्यावर तडीपार गुन्ह्याचा भंग केल्या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन दिवसा पूर्वीच मध्यवर्ती पोलिसांनी एका तडीपार गुंडाला तडीपारीचा भंग केल्या प्रकरणी अटक केली. पोलिस परिमंडळातून तडीपार केलेल्या गुंडाची चौकशी केलीतर, बहुतांश गुंड परिमंडळ हद्दीत सर्रासपणे राहत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यांना राजकीय व पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चाही होत असून पोलिस प्रशासन बघाची भूमिका वठवित आहेत. अशी टीका सर्वस्तरातून होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस