मुंबई : घरखर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून ट्रॉम्बेमध्ये पतीने पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आयशाबी जीतू परदेशी (२७) या गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी शनिवारी ट्रॉम्बे पोलिसांनी पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
ट्रॉम्बे चित्ताकॅम्प परिसरात परदेशी या पतीसोबत राहतात. शुक्रवारी सायंकाळी पतीने पैशांवरुन आयशाबी यांना शिवीगाळ सुरु केली. दोघांमध्ये बाचाबाची झाली. तिने पैसे देण्यास नकार देताच पतीने स्वयंपाक घरातीन चाकूने तिच्यावर मानेवर वार करून पळ काढला. स्थानिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आयशाबी यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. शनिवारी त्या शुध्दीवर येताच ट्रॉम्बे पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हस प्रकार घटनाक्रम उघडकीस आला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पतीवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.