शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

अखेर संजय कुटेंनी जळगाव-जामोदचा रस्ता धरला, ठिय्या आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 8:21 PM

Attempt to attack on MLA Sanjay Kutten's vehicle : दोषांवर कारवाई होईस्तोवर बुलडाणा सोडणार नाही- कुटे

ठळक मुद्दे दुसरीकडे माजी मंत्री तथा विद्यमान आ. संजय कुटे यांच्या वाहनावरील कथितस्तरावरील दगडफेक आणि हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर बुलडाणा शहरातील वातावरण तणावपुर्ण बनले होते.

बुलडाणा: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद १९ एप्रिल रोजी बुलडाण्यात उमटले. संपूर्ण प्रकाराचा निषेध करून बुलडाण्यातून परत जात असतना काही अज्ञातांनी माजी मंत्री तथा आ. संजय कुटे यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न केला.या प्रकारामुळे नमते घेतलेल्या माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी जो पर्यंत दोषिंवर कारवाई होत नाही, तोवर बुलडाणा न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या मलकापूर नाक्यापासून जवळपास दीड किलोमीटर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयापर्यंत भाजप कार्यकर्ते व आ. श्वेता महाले, माजी आ. विजयराज शिंदे यांच्यासह पायी येत त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच ठिय्या दिला. दरम्यान त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांशी चर्चा करण्यासाठी आमदार द्वय आणि माजी आ. विजयराज शिंदे गेले होते. मात्र जो पर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोवर बुलडाणा सोडणार नसल्याची आपली भूमिका ठाम असल्याचे आ. कुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दुसरीकडे माजी मंत्री तथा विद्यमान आ. संजय कुटे यांच्या वाहनावरील कथितस्तरावरील दगडफेक आणि हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर बुलडाणा शहरातील वातावरण तणावपुर्ण बनले होते. भाजपचे आमदार द्वय डॉ. कुटे आणि श्वेता महाले यांनी पुन्हा बुलडाण्यात येण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्वत: जुना मलकापूर नाका काठून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आ. कुटे हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. तर दोन आमदारांनाही पोलिस संरक्षण देऊ शकत नाही, या बद्दल आ. श्वेता महाले यांनी एसपीकडे खेद व्यक्त केला. यावेळी घोषणाबाजी करत त्यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. सायंकाळी सात वाजेत पर्यंत पोलिस अधीक्षकांच्या दालनात आमदरा कुटे, श्वेता महाले, माजी. आ. विजयराज शिंदे यांच्या पोलिस अधीक्षकांशी चर्चा सुरू होती. मात्र चर्चा कुठल्याही निर्णयाप्रत आली नव्हती.

आ. कुटे जळगावकडे रवानाआ. कुटे यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आश्वासन दिल्यानंतर आ. संजय कुटे यांनी बुलडाण्यातील त्यांच्या ठिय्या आंदोलनाचा निर्णय मागे घेतले आहे. सोबतच सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास त्यांनी जळगाव जामोदचा रस्ता धरला. दरम्यान एक दिवसात आक्षेपार्ह्य विधान तथा वाहनावर हल्ला प्रकरणात कारवाई न झाल्यास पुन्हा भाजपतर्फे जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी पाच ते सात जणांना सायंकाळी अटक केली असल्याची माहिती आहे. त्यानंतर आ. कुटे यांनी त्यांची आक्रमक भुमिका बदलली. आणि जळगाव जामोदकडे रवाना झाले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMLAआमदारSanjay Gaikwadसंजय गायकवाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाJalgaonजळगाव