नेवासा (जि.अहमदनगर) : महाराष्ट्रात महावितरण प्रशासनाकडून सक्तीची थकीत वीज बिल वसुली मोहीम राबविली जात आहे. या विरोधात भाजपचे नेते आंदोलने करत आहेत. नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचेमी शेतीपंपाची वीज जोडणी महावितरण प्रशासनाकडून खंडित करण्यात येत आहे. या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महावितरण कार्यालयात एकच गोंधळ उडाला त्यांच्या गळ्याचा फास काढण्यात आला नंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. वीज बिलांची सक्तीची वसुली सुरू आहे. या संदर्भात बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही महावितरण अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज मुरकुटे यांनी नेवासे महावितरण कार्यालयामध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुरकुटे यांनी दोरी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न करताच त्यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविल्याने अनर्थ टळला.
भाजपच्या माजी आमदाराचा महावितरण कार्यालयात गळफास लावून घेण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 20:52 IST