नाशिक- नुकत्याच नाशिक महापालिकेत रुजू झालेल्या आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नावाने गंडा घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उघड झाले आहे. एका डुप्लिकेट नंबरच्या आधारे आयुक्तांशी संबंधित व्यक्तींना मेसेज करून पैशाची मागणी करण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर या संदर्भात आयुक्त पुलकुंडवार यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून कोणीही या भामट्याच्या नंबरवर प्रतिसाद देऊ नये असा आवाहन केले आहे.आयुक्त पुलकुंडवार यांच्या नावाने आणि त्यांचा फोटो वॉट्स अपला डीपी ठेवून एका भामट्याने हा प्रकार सुरू केला होता सकाळी अनेक जणांना मेसेज करून तुम्ही कुठे आहात वगैरे त्यांनी चौकशी सुरू केली आणि प्रतिसाद देणाऱ्यांकडे पैशांची मागणी सुरू केली त्यामुळे अनेकांनी आयुक्तांशी संपर्क साधला असता हा प्रकार उघडकीस आला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात आयुक्तांना कळवले होते तर आयुक्तांनी पोलिसांची संपर्क साधून तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवली आहे.
आयुक्तांचे आवाहन असे..कुणीतरी भामटा माझ्या नावाने 9834246263 या नंबरवरून महापालिका अधिकाऱ्यांना व्हाट्सॲप मेसेज करून पाठविलेल्या लिंकवर पेमेंट करण्यास सांगतोय. त्याने माझा फोटो डिपी वर ठेवला आहे.
माझा कार्यालयीन कामासाठी फक्त 9702100056 हा एकच नंबर आहे.मी पोलीस आयुक्तांकडे रीतसर तक्रार केलेलीच आहे.अशा भामट्यांच्या मेसेजला बळी पडू नका. कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका.