शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘त्या’अंगडियाकडूनच लाच देण्याचा प्रयत्न; सौरभ त्रिपाठीची पाेलीस अधिकाऱ्यांना माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 9:23 AM

पेन ड्राईव्हमध्ये दिलेले ऑडिओ रेकॉर्डिंग टेम्पर केले असावे, असा संशय गुन्हे शाखेला आहे.

मुंबई :  अंगडिया वसुली प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अंगडियाकडूनच कारवाई नको, यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी सांगितल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्रिपाठी यांनी त्यांच्याविरूद्ध  सुरू असलेल्या प्राथमिक तपासादरम्यान एक ऑडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह तपास अधिकाऱ्यांना सुपूर्द केला होता. या पेन ड्राईव्हमध्ये दिलेले ऑडिओ रेकॉर्डिंग टेम्पर केले असावे, असा संशय गुन्हे शाखेला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगडियाकडून करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये त्रिपाठीने महिन्याला १० लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान त्रिपाठी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.  सावंत यांच्यासमोर आपली बाजू मांडताना त्रिपाठी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी आपल्या बचावात एक ऑडिओ रेकॉर्डिंग सावंत यांना दिली. ज्याद्वारे त्यांना अंगडियांचा गट आपल्याला भेटला होता. तसेच त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या अंगडिया व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, म्हणून दर महिन्याला लाच देण्याची ऑफर केल्याचे यातून दाखविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.दुसरीकडे, अंगडिया असोसिएशनकडूनदेखील एक ऑडिओ क्लिप पोलिसांना देण्यात आली आहे. यामध्ये  त्रिपाठी अंगडियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच त्यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्यास सांगत आहेत. या प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन पोलीस अधिकाऱ्यांसह चारजणांना अटक  केली आहे, तर त्रिपाठीचा शोध सुरू आहे.ऑडिओ रेकॉर्डिंगची सत्यता तपासणारत्रिपाठी यांनी दिलेली ऑडिओ रेकॉर्डिंग टेम्परिंग केली असावी किंवा ती स्क्रिप्टनुसार बनविण्यात आली असावी, असे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले. या आधारावर त्रिपाठी स्वतःचा बचाव करू शकतील. त्यामुळे फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार गुन्हे शाखा करत आहे. जेणेकरून या ऑडिओ रेकॉर्डिंगची सत्यता तपासता येईल. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.