लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव : येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम देपूळ येथे शेतामधील वादाच्या कारणावरून दोन गटात मारहाण झाली. २२ जूनला घडलेल्या या घटनेत आरोपींनी आपणास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार ८० वर्षीय वृद्धाने ३ जुलै रोजी पोलिसांत दाखल केली. त्यावरून पोलिसांनी १० आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी याच घटनेत एका महिलेच्या तक्रारीवरून पाच आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल झाले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी शेतामधील वादातून दोन गटात मारहाण झाली. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी महिलेच्या तक्रारीवरून पाच जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत; तर दुसऱ्या गटातील ८० वर्षीय वृद्ध किसन नामदेव गंगावणे यांनी ३ जुलै रोजी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की स्वत:च्या शेतात निंदणाचे काम करण्यासाठी मजूर घेवून गेलो असता, आरोपी महिलेसह अन्य आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी निवृत्ती गंगावणे, नवनाथ गंगावणे, रघुनाथ गंगावणे, रंगा गंगावणे, गंगाराम गंगावणे, बालाजी गंगावणेसह दहा आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३०७, १४३, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
देपूळ येथे शेतीच्या वादातून ८० वर्षीय वृद्धाला जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 2:24 PM
आसेगाव : येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम देपूळ येथे शेतामधील वादाच्या कारणावरून दोन गटात मारहाण झाली.
ठळक मुद्देआरोपींनी आपणास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार ८० वर्षीय वृद्धाने ३ जुलै रोजी पोलिसांत दाखल केली.त्यावरून पोलिसांनी १० आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.