शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
3
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
4
दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
5
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
6
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीची मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
7
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
8
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
9
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
10
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
11
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
12
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा
13
मराठी अभिनेत्रींना हिंदी सिनेमांत कामवाली बाईच का दाखवतात? तृप्ती खामकर म्हणाली- "कारण..."
14
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
15
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
16
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
17
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
18
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
19
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
20
Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?

भावाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 1:28 AM

निवृत्त पोलिसाला अटक : भावजयीवरही चाकूने हल्ला, पोलिसांनी वाचविले प्राण

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  घराचा ताबा मागणाऱ्या भावजयीवर चाकूचे वार केल्यानंतर यात मध्यस्थी करणाऱ्या अजय बाळा कर्डक (२८, रा. उल्हासनगर) या चुलत भावाचा चाकूचे वार करून खून करणाऱ्या निवृत्त पोलीस जमादार महेंद्र कर्डक (५५) याला श्रीनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. त्याचवेळी खुनी हल्ला झालेल्या नीता कर्डक हिला तातडीने रुग्णालयात दाखल करून तिचेही प्राण वाचविले आहे.

     हवालदार राजन कर्डक यांचा २०१८ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराचा ताबा हा त्यांचा भाऊ महेंद्र यांच्याकडे होता. पतीच्या निधनानंतर आपल्या घराचा ताबा मिळविण्यासाठी नीता या महेंद्र यांच्याकडे पाठपुरावा करीत होत्या. ६ जानेवारीला रात्री किसननगर येथील विजय सदन येथील महेंद्र यांच्याकडून आपल्या घराचा ताबा घेण्यासाठी पुन्हा चुलत दीर अजय (२८) आणि अन्य एक नातेवाईक शंकर मालविया यांच्यासह गेल्या. तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यातूनच महेंद्र याने घरातील सुरीने नीताच्या गळ्यावर वार केले. त्याच दरम्यान श्रीनगर पोलिसांना या भांडणाची माहिती मिळाली. हा हल्ला झाल्यानंतर बीटमार्शल मुकुंद राठोड व सुनील धोंडे तिथे पोहाेचले. त्यावेळी रक्तबंबाळ अवस्थेत तिथून बाहेर पडलेल्या नीता यांच्या गळ्याला ओढणीने बांधून राठोड यांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले. तर धोंडे यांनी हल्लेखोराचा शोध घेतला. तोपर्यंत त्याने या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या अजय यांच्यावरही चाकूने वार केले. त्यानंतर तो स्वत:वर वार करण्याची धमकी देत होता. अजय हा देखील रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

धोंडे यांनी महेंद्रच्या हातातील चाकू काढला. नंतर, स्थानिकांच्या मदतीने त्याला पोलीस ठाण्यात नेले.  अजयला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

आयुक्तांनी केले कौतुकपोलीस अंमलदार राठोड आणि धोंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या महिलेचे प्राण वाचविले. तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीलाही अटक केल्याबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी त्यांचे कौतुक केले.