कोरोना व्हायरसच्या संकटात मानवतेचं दर्शन घडवणारे अनेक प्रसंग आतापर्यंत ऐकीवात आले. लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्या मजूरांच्या मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केले. काहींनी आर्थिक मदत केली, तर काहींनी मजूरांना अन्न पुरवले. आजही अनेक NGO लोकांना मदत करत आहे. पण, दुसरीकडे कोरोनामुळे नात्यांमध्ये दुरावा आल्याचंही पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये अशीच एक घटना घडल्याचं समोर येत आहे. 90 वर्षीय आईला कोरोना झाला म्हणून मुलानं तिला चक्क जंगलात सोडलं आणि तिथून पळ काढला. वृद्ध महिलेला कोरोना झाला होता आणि कुटुंबातील सदस्य तिला घरी ठेवण्यास तयार नव्हते. नातेवाईकांनी तिला रात्रीच्या अंधारात औरंगाबाद येथील कच्चीघाटी जंगलात सोडून दिले.
एक चादर देऊन वृद्ध महिलेला जंगलात सोडले. काही लोकांना ही महिला सापडली आणि त्यांनी पोलिसांना कळवले. महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यनंतर तिला कोरोना झाल्याचे समोर आले. तिची विचारपूस केल्यानंतर तिनं कोरोना झाल्याचे कुटुंबीयांना माहीत पडले होते, असे सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार ही महिला एका तास जंगलात तडफडत होती. आता तिची प्रकृती ठिक आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवली असून तिच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे.
राज्यात शुक्रवारी 10483 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या 4 लाख 90262 अशी झाली आहे. त्यापैकी 3 लाख 27281 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 45582 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Air India Express Accident : थरकाप उडवणारा प्रसंग; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं!
सॅल्यूट... दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली, वाचले अनेकांचे प्राण; भावाची हळवी पोस्ट
जय महाराष्ट्र!.... उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये
शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानची हाराकिरी; तिसऱ्या दिवशी पडल्या 14 विकेट्स
बोंबला! डुक्करामुळे तो विवस्त्र धावत सुटला, जाणून घ्या व्हायरल फोटोची गंमत...
दहा वर्षांच्या प्रेमानंतर अखेर टीम इंडियाचा क्रिकेटपटू चढला बोहोल्यावर!