मुंबई : उच्चभू्रंच्या पार्ट्यांमध्ये वापरल्या जाणाºया एलएसडी या नशायुक्त पेपरची तस्करी करणाºया आंतरराष्टÑीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला यश आले. वांद्रे येथील दि हवॉयन शॅक हॉटेलजवळ एकाला अटक करून त्याच्याकडील ३१.५ ग्रॅम वजनाचे एकूण १,५५१ एलएसडी पेपर जप्त करण्यात आले. आंतरराष्टÑीय बाजारात त्यांची किंमत १ कोटी ८.५७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.डॉ. रेझा फरेडून बोरहानी शिदाणी (वय ५०) असे अटक तस्कराचे नाव आहे. बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध मॉडेलाचा तो पती असून, ‘पेज थ्री’ पार्टीत तो एलएसडी विकत असल्याचा संशय आहे.अमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान कक्षातील प्रभारी निरीक्षक सुनील जाधव, सहायक निरीक्षक प्रशांत मोरे यांना शुक्रवारी वांद्रेतील दि हवॉयन शॅक हॉटेल परिसरात अमली पदार्थ घेऊन तस्कर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा लावून रात्री संशयास्पद फिरणाºया डॉ. रेझा फरेडूनला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे ३१.५ ग्रॅमचे एलएसडीचे १,५५१ कागद सापडले. आॅस्ट्रेलियातून त्याची आयात केली असून, आंतरराष्टÑीय टोळीकडून त्यांची तस्करी करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे विभागाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. त्याच्या अन्य सहकाºयाचा शोध घेण्यात येत आहे.एका प्रसिद्ध मॉडेलचा पती असलेल्या डॉ. रेझा फरेडून बोरहानी शिदाणी हा केनबिस हेल्थ अँड सायन्स प्रायव्हेट कंपनीचा संस्थापक अध्यक्ष आहे, तसेच तो प्रकल्प विकासाबाबत सल्लागार म्हणून काम करत असल्याने, त्याचा विविध क्षेत्रांतील उच्चभू्रंशी संपर्क होता. त्यांना पार्ट्यासाठी तो एलएसडी पेपर पुरवित असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
आॅस्ट्रेलियातून अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला अटक, एक कोटीचे ‘एलएसडी’ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 6:01 AM