अल्पवयीन मुलीला ऑटोचालकाने इंदूरहून मुंबईला नेले, मायानगरीत केले 'हे' घाणेरडे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 06:22 PM2022-05-23T18:22:47+5:302022-05-23T18:23:20+5:30
Rape Case : मुलीवर अनेकवेळा बलात्कार झाला. मुंबईतून कसा तरी पळ काढून अल्पवयीन मुलाने कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार केली.
इंदूर: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हणजेच मिनी मुंबई अर्थात इंदूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका ऑटोचालकाला अटक केली आहे. ऑटोचालकाने आधी अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याने मुलीला आमिष दाखवून मुंबईला नेले. तेथे मुलीवर अनेकवेळा बलात्कार झाला. मुंबईतून कसा तरी पळ काढून अल्पवयीन मुलाने कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार केली.
प्रकरण चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिस स्टेशन प्रभारी अजय नेमा यांनी सांगितले की, तक्रार मिळताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत. त्याला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू आहे. लवकरच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कार उडवली अन् पोलिसांचा युनिफॉर्म फाडला; रेंज रोव्हर गर्लचा हाय व्होल्टेज ड्रामा
चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या या तरुणाने प्रथम परिसरातील एका अल्पवयीन रहिवाशाशी मैत्री केली आणि नंतर तिला आमिष दाखवून मुंबईला नेले. जिथे तिच्यावर अनेकदा बलात्कार झाला. या अल्पवयीन मुलीने कसतरी इंदूर गाठलं आणि संपूर्ण घटना कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.