रायगढ - छत्तीसगडमधील रायगढ स्टेडियम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काही स्टेडियमच्या मुलांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले होते. रविवारी पुन्हा स्टेडियममध्ये बास्केटबॉलच्या खेळाडूंनी दिल्ली कोच आणि महिला प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले. या दोघांविरोधात तक्रार देण्यासाठी अल्पवयीन मुली आपल्या कुटुंबियांसह पोलिस ठाण्यात पोहोचल्या. महिला पोलिस कक्षाने या दोघांविरूद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे.मुलीच्या कुटूंबाने सांगितले की, एनआयए दिल्लीचे प्रशिक्षक मुलींना कपडे काढण्याची शारीरिक चाचणी घेण्यास सांगतात. यामध्ये महिला प्रशिक्षकही त्यांच्यासोबत सहभागी असतात आणि त्यांनी तसे न केल्यास त्यांना खेळाच्या मैदानाबाहेर टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप परिवाराने केला आहे. हे सर्व कित्येक महिन्यांपासून सुरु आहे. मुली अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांना याबद्दल सांगितले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्याचवेळी महिला पोलिस सेल प्रभारी मंजू मिश्रा म्हणाल्या की, दोन मुलींच्या कुटूंबियांकडून त्यांनाही प्रशिक्षकाविरूद्ध लेखी तक्रार मिळाली आहे. उच्च अधिकाऱ्यांना या तक्रारीबद्दल माहिती देण्यात आली आहे. चौकशी सुरू आहे, तपासणीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.महिला कोचने मुलींना जेल परिसरातील तिच्या खोलीत बोलावले आणि त्यानंतर शारीरिक चाचणीच्या बहाण्याने तिला दुसर्या खोलीत प्रशिक्षकासमोर कपडे काढण्यास भाग पाडले गेले असा आरोप आहे. मुलींनी याला नकार दिला. आता पीडित मुलींचे पालक कोचवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
भयंकर! फिजिकल टेस्टच्या नावाखाली कोचने खेळाडूंना सांगितले, सर्व कपडे उतरवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 8:56 PM
Crime News : महिला पोलिस कक्षाने या दोघांविरूद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे.
ठळक मुद्देमुलीच्या कुटूंबाने सांगितले की, एनआयए दिल्लीचे प्रशिक्षक मुलींना कपडे काढण्याची शारीरिक चाचणी घेण्यास सांगतात.