मुंबई - आझाद मैदान येथे १ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या आंदोलनात देशद्रोहाचे विधान केल्याने अटकेत असलेल्या इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी उर्वशी चुडावालासहित ५१ जणांविरोधात सोमवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात भा. दं. वि. कलम १२४अ (राजद्रोह), १५३ब, ५०५ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.मुंबई प्राईड सॉलिडेटरी गॅदरींग निमित्ताने काही विद्यार्थ्यी १ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान येथे जमा झाले होते. याचे नेतृत्व उर्वशि चुडावाला करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. जमलेल्या विद्यार्थ्यांनी CAA आणि NRC विरोधात घोषणाबाजी केली होती. दरम्यान, त्यांनी जेएनयूचा अटक विद्यार्थी नेता शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा देखील दिल्या होत्या. या घटनेची गंभीर दखल विरोधीपक्षासह इतर सामाजिक संघटनांनी घेतली. विरोधी पक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणांचा व्हिडिओ त्याच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला. तसेच याबाबत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.
या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी अखेर विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणाऱ्या उर्वशी चुडावालासह ५१ जणांविरोधात भा. दं. वि. कलम १२४ अ (राजद्रोह), १५३ब, ५०५ आणि ३४ कलमांनुसार गुन्हा नोंदवला. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. शरजील हा बिहारच्या जहानाबादमधला रहिवासी आहे. त्याचे वडील अकबर इमाम जेडीयूचे नेते राहिले आहेत. अकबर इमाम यांनी जेडीयूच्या तिकिटावरून जहानाबादवरून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. शरजील कारण नसताना याप्रकरणात फसवलं गेल्याचा आरोप त्याच्या काकांनी केला. शरजील इमामचा तपास गुन्हे शाखेच्या पाच टीम करत होत्या. त्याच्याविरोधात सहा राज्यांत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरजील काहीही बोलला तर एवढा हंगामा कशासाठी?; अबू आझमींचा सवाल
शरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती उघड
देश तोडण्याची भाषा करणारा शरजील 'प्रेयसी'मुळे फसला जाळ्यात; 'असा' आखला पोलिसांनी प्लॅन