करीमगंज - आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्यात पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या या धाडीत ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेला तब्बल 2361 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या पथकाने दोन गांजा तस्करांनाही अटक केली आहे. त्रिपुराहून येत असताना पोलिसांनी चेकपोस्टवर संशय आल्याने कसून चौकशी केली. त्यामुळे, ही तस्करी उघडकीस आली.
करीमगंज पोलिसांनी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे. तसेच, पुढील तपासही सुरू केला आहे. याप्रकरणाची आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनीही दखल घेत पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. तसेच, पोलिसांनी राज्यातील नशेले पदार्थांच्या तस्करीविरुद्धही ही मोहीम सुरूच ठेवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, शनिवारी रात्रीही पोलिसांनी एका परिसरात ट्रममध्ये असलेला 256 किलो वजनाचा गांजा जप्त केला होता.