अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी हरियाणातील कैथल येथील रहिवासी अमित कुमार याला अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी हत्याकांडातील आरोपी अमित हिसामसिंह कुमार याला बुधवारी (२३ ऑक्टोबर) गुन्हे शाखेने अटक केली. २९ वर्षीय अमित हरियाणातील कैथल येथील रहिवासी आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वी बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित १० आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली होती. रविवारी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी हत्या प्रकरणातील आरोपी भागवत सिंह (३२) याला नवी मुंबईतील बेलापूर येथून अटक केली. तो मूळचा राजस्थानच्या उदयपूरचा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या दिवसापर्यंत भागवत सिंह मुंबईच्या बीकेसी भागात राहत होते. तपासादरम्यान भागवत सिंहनेच गोळीबार करणाऱ्यांना शस्त्र पुरवल्याचं समोर आलं. रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं, त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत आता आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली आहे की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्याआधी शूटर्सनी कर्जत खोपोली रोडवरील जंगलात पिस्तुलाने गोळीबार करण्याचा सराव केला होता.