मेरठ हत्याकांड प्रकरणावर बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे. "आजकाल भारतात निळ्या ड्रमची खूप चर्चा होत आहे आणि अनेक पती सदम्यात आहेत. देवाचे आभार, मी लग्न केलं नाही" असं म्हटलं आहे. मेरठच्या या भयानक हत्याकांडात मुस्कान रस्तोगी नावाच्या महिलेने तिचा प्रियकर साहिल शुक्लासोबत मिळून पती सौरभ राजपूतची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली.
बागेश्वर बाबा प्रतिक्रिया देताना म्हणाले, "मेरठमध्ये घडलेलं हे हत्याकांड अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे. सध्याच्या काळात पाश्चात्य संस्कृतीच्या आगमनामुळे आणि प्रेमसंबंधांमुळे, विवाहित पुरुष आणि स्त्रिया घटस्फोट देण्याचा किंवा कुटुंबाचा नाश करण्याचा कट रचत आहेत. कोणाचाही मुलगा किंवा मुलगी हे करत असेल, तर ते पालकत्वाचा अभाव दर्शवतं."
"भारतीयांनी आपल्या कुटुंबांना सुसंस्कृत बनवण्यासाठी 'श्री रामचरितमानस'ची मदत घ्यावी. भारतीय संस्कृती आणि धर्मग्रंथांमधून प्रेरणा घेतली तर अशा घटना रोखता येतील. समाजात असे गुन्हे घडू नयेत म्हणून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत." चौकशीदरम्यान असं आढळून आलं की, मुस्कान आणि साहिल हे व्यसनी होते. त्यांनी सौरभची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
जेलमध्ये पूर्ण झाली साहिलची 'ही' खास मागणी; अधिकाऱ्यांनी सांगितलं का पूर्ण केली आरोपीची इच्छा?
मेरठ जेलमध्ये असलेल्या साहिल आणि मुस्कानबद्दल दररोज नवीन माहिती समोर येत आहेत. जेलमध्ये जाण्यापूर्वी दोघेही व्यसनी होते. पण आता जेलमध्ये त्यांची प्रकृती सुधारत आहे. दोघांनाही वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं आहे. याच दरम्यान, साहिलने जेल अधिकाऱ्यांकडे एक खास मागणी केल्याचं समोर आलं आहे. हे ऐकून अधिकाऱ्यांना सुरुवातीला धक्का बसला पण लवकरच त्यांनी त्याची ती मागणी पूर्ण केली.