धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भाईंदरच्या उत्तन-पालखाडी भागात पिंजऱ्यात सापडलेल्या बिबट्या तसेच २ जंगली डुक्कर प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल करून अटक केलेल्या डॅनी घोन्साल्विस ह्याला शनिवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला.
डॅनी याने त्याच्या वाडीत बसवलेल्या पिंजऱ्यात कोंबडीच्या मांसाचा चारा ठेवला असता शनिवारी त्यात मादी बिबट्या वाघ अडकला होता . जखमी बिबट्यास वन विभागाने सोडवून उपचारास नेले. वन विभागाने या प्रकरणी डॅनी ह्याला शुक्रवारी वन कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली होती . डॅनी ने पकडलेली दोन डुकरं जंगली असल्याच्या तपासणी साठी वन विभागाने नेली होती . शिवाय डॅनी याने बनवलेला पिंजरा देखील जप्त केला होता.
शनिवारी ठाणे न्यायालयात वन विभाग ठाणेच्या सहायक वन संरक्षक गिरीजा देसाई उपस्थित होत्या व वन विभागाने आरोपीची ५ दिवसां करीता कोठडी मागितली होती . परंतु न्यायालयाने मागणी अमान्य करत डॅनी ह्याला जमीन मंजूर केला.