मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दामपत्यांची आजची रात्र ही तुरुंगात जाणार आहे. सत्र न्यायालयाने आज सकाळीच निकाल दिला असला तरी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब लागल्याने राणा दामपत्या ला आज ची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे.
आमदार रवी राणा यांना जामीन अर्ज मंजूर झाला असला तरी आजची रात्रही तळोजा कारागृहातच जाणार आहे. जामीनाची प्रत कारागृह प्रशासनाला अद्याप मिळाली नसल्याने राणा यांना बुधवारची म्हणजे आजची रात्र कारागृहातच घालवावी लागणार आहे. कारागृह प्रशासनाने सायंकाळी 5.30 टपाल पेटित जमिनीची प्रत आढळली नसल्याने राणांचा एक दिवसाचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची आज तुरुंगातून सुटका करण्यात येणार नाही कारण त्यांच्या सुटकेचे आदेश संबंधित दंडाधिकारी न्यायालयाकडून वेळेत मिळू शकले नाहीत. त्यांची टीम उद्या सकाळी कोर्टाकडून सुटकेचे आदेश प्राप्त करेल आणि नंतर भायखळा आणि तळोजा कारागृहात जाईल, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे रवी राणा यांना तळोजा कारागृहात तर नवनीत राणा यांना भायखळा कारागृहात आजची रात्रं काढावी लागणार आहे.
शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. जवळपास १२ दिवस कोठडीत राहिल्यानंतर राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मंजूर करताना कोर्टाने राणा दाम्पत्याला सक्त ताकिद देत कठोर अटीं घातल्या आहेत. जामीन मंजूर झाल्यानंतर नवनीत राणा यांना तुरुंगांतून थेट जे . जे. रुग्णालयात नेण्यात आलं. मानेच्या दुखण्यामुळे त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्यात आले. रात्री त्यांना मान, पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.