औरंगाबाद: लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झालेल्या बंगळुरूच्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून हर्सूल -सावंगी येथील शेतात नेऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. याविषयी हर्सूल पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
सय्यद अश्फाक इब्राहिम (रा. हर्सूल सावंगी)असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. हर्सूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अविवाहित तरूणी ही बंगळुरू येथे आई आणि भावासह राहते. तिने लग्न जुळविणाऱ्या एका संकेतस्थळावर तिची प्रोफाईल (माहिती) बनवली होती. ही माहिती वाचून आरोपीने गतवर्षी तरूणीशी संपर्क साधला आणि त्याला ती पसंत असल्याचे म्हणाला. यानंतर तो तिला भेटण्यासाठी बंगळुरूला गेला. यानंतर तुला माझे आई-वडिल आणि घर दाखवितो, असे सांगून तो तिला घेऊन सावंगीतील शेतातील घरी गेला. तेथे त्याने तिला गुंगी आणणारी गोळी खाण्यास देऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडितेने आक्षेप घेतल्यानंतर आपण लग्न करणारच आहोत,असे सांगून तिची समजूत काढली. यानंतर त्याने तिला बंगळुरूला नेऊन सोडले. फेब्रुवारी २०१९ मध्ये तो तिला बंगळुरूमधून पुन्हा सावंगीतील शेतात घेऊन गेला आणि गुंगीची गोळी खाण्यास देवून तिच्यावर अत्याचार केला.आणि तिला त्याने पुन्हा तिच्या गावी नेऊन सोडले.
काही दिवसानंतर त्याने अचानक पीडितेसोबतचे बोलणे कमी केले. यामुळे पीडितेने त्याला याबाबत विचारले असता तो लग्नाला टाळाटाळ करीत. २२ आॅगस्ट रोजी त्याने तिला फोन करून हा शेवटचा कॉल असल्याचे सांगितले. तिला शिवीगाळ करून लग्नास नकार दिला. आरोपीने आपला विश्वासघात केल्याचे लक्षात येताच पीडितेने थेट औरंगाबादेत येवून हर्सूल ठाण्यात तक्रार नोंदविली. हा गुन्हा फुलंब्री ठाण्याकडे वर्ग केला जात आहे.
पाच लाखाचे दागिने आणि २५ हजाराची रोकड घेतलीएप्रिल महिन्यात तो बंगळुरूला गेला. तेथे त्याने खरेदीच्या बहाण्याने तिला बाजारात नेले. तेथे त्याने तिला लग्नापूर्वी आपल्यासाठी एक घर खरेदी करायचे असल्याचे म्हणाला. याकरीता पैसे कमी पडत आहे, तुझ्याजवळील पैसे आणि दागिने दे, लग्नानंतर तुला सर्व परत करतो, असे त्याने तरूणीला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला रोख २५ हजार रुपये आणि ५ लाखाचे सोन्याचे दागिने दिले. हा ऐवज घेऊन तो औरंगाबादला आला.