ठळक मुद्देबांगलादेशी आई आणि तिची मुलगी बेकायदेशी वास्तव्य करत आल्याची माहिती मिळाल्यानंतर या माहितीची शहानिशा करण्यात आली.दोघी गेल्या तीन महिन्यांपासून परिसरात राहून घरकाम करत होत्या, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मीरा रोड - देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी आई आणि तिच्या मुलीस अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचे प्रमाण वाढू नये यासाठी सर्वत्र बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. बांगलादेशी आई आणि तिची मुलगी बेकायदेशी वास्तव्य करत आल्याची माहिती मिळाल्यानंतर या माहितीची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर काशिमीराच्या नीलकमल नाका येथून शनिवारी संध्याकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने त्या दोघींनाही अटक केली. दोघी गेल्या तीन महिन्यांपासून परिसरात राहून घरकाम करत होत्या, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यांची चौकशी सुरू असून आणखी काही जण अशाप्रकारे बेकायदा वास्तव्य करत आहेत का, याचाही तपास करण्यात येत आहे.