मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) दहिसर शाखेत भरदुपारी गोळीबार करत अडीच लाख रुपये घेऊन पळ काढला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलीस तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हल्लेखोराला शोधण्यासाठी ८ पथकांची नियुक्ती करण्यात आली. तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखा देखील समांतर तपास करत आहे.
दहिसरच्या जी. एस. सावंत रोडवर एसबीआयची ही शाखा असून, आठ जण या ठिकाणी काम करतात. मात्र घटना घडली त्या वेळी सहा जण बँकेत हजर होते आणि बँकेचा गार्ड त्या ठिकाणी नव्हता. उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना माहिती मिळताच एमएचबी पोलीस, परिमंडळ ११ चे अधिकारी तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
तातडीने नाकाबंदी करत घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यास सुरुवात केली. मात्र ते दोघे नेमके कुठून पसार झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच गोळीबारात जखमी झालेल्या संदेश गोमाने याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
अशी घडली घटनासाडेतीनच्या सुमारास रस्त्यावरून चालत दोघे बँकेत शिरले. त्यांनी गोळीबार करत अडीच लाख रुपये घेऊन पळ काढला.