उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये घटस्फोटानंतर पत्नीला कमी नुकसान भरपाई देण्यासाठी एका व्यक्तीने आयकर आयडी पासवर्ड हॅक करण्याचा प्रयत्न केला. आयडी पासवर्ड छेडछाडीचा मेसेज पत्नीच्या मोबाइलवर आला, त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकूरगंज येथे राहणारा बँक अधिकारी अक्षत विजय याच्यावर पत्नीबरोबर घटस्फोटाचा खटला सुरू आहे. एकाने अक्षतला सांगितले की, जर त्याने आयटी रिटर्नच्या कागदपत्रांमध्ये आपल्या पत्नीच्या उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न दर्शविले तर त्याला कमी नुकसान भरपाई द्यावी लागेल. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अक्षतने आयटीआर भरण्यासाठी वापरलेल्या आयडीचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न केला. या पासवर्ड छेडछाडीची माहिती महिलेच्या फोनवर मिळाली, त्यानंतर पत्नीने स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांच्या घटस्फोटाबाबत यावर्षी मार्च महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाहाकार! आईने पोटच्या तीन मुलाने दिले विष अन् नंतर स्वतःही केले प्राशन
पोलीस म्हणतात की, कोणीही वैयक्तिक डेटा वापरु शकत नाही. हे करणे नियमांच्या विरोधात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हा खटला सायबर सेलकडे देण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.