शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

"अमित शाह बोलतोय, निवडणुकीत तिकीट पाहिजेत तर पैसे पाठवा", माजी आमदाराला फसवणुकीचा आला कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:42 AM

एका फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असल्याचे सांगत माजी आमदाराला फोन केला.

बरेली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. पक्षांकडून तिकीट मागणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यामध्ये भाजपाकडून तिकीट मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे फेऱ्याही उमेदवारांनी सुरू केल्या आहेत. शिफारशींची फेरीही सुरू झाली आहे. यादरम्यान, काही फसवणूक करणारेही सक्रिय झाले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील बरेली येथून समोर आला आहे.

येथील एका फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असल्याचे सांगत माजी आमदाराला फोन केला. तसेच, लोकसभा निवडणुकीचे तिकीट हवे असेल तर पैसे पाठवा, असे त्याने फोनवर सांगितले. यानंतर माजी आमदार काहीसे सावध झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आणि एकाला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण क्षेत्र) मुकेश चंद्र मिश्रा म्हणाले की, बरेलीच्या नवाबगंज पोलीस ठाण्यात निरीक्षक विनोद कुमार यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असे भासवून एका टोळीचे सदस्य तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली राजकारण्यांना फोनवरून फसवतात, असे सांगण्यात आले आहे. ते म्हणाले की, नवाबगंज पोलीस स्टेशन क्षेत्रातील समूहा गावातील रहिवासी रवींद्र मौर्य याने माजी आमदार किशनलाल राजपूत यांच्याशी ४ जानेवारी आणि २० जानेवारी २०२४ रोजी नऊ वेळा फोनवर बोलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तोतयागिरी करून मी त्यांच्याशी बोललो आणि माजी आमदाराकडून तिकीटाचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, असे रवींद्र मौर्य याने सांगितले. ट्रू कॉलर ॲपवर नंबर तपासल्यावर केंद्रीय गृहमंत्री, केंद्र सरकारच्या नावाचा आयडी दिसत होता. तसेच, मुकेश चंद्र मिश्रा सांगितले की, पोलिस तपास करत असल्याचे रवींद्र मौर्य याला समजल्यावर त्याने सिम तोडले. तसेच, ज्या क्रमांकावरून माजी आमदारांना कॉल करण्यात आला होता, तो क्रमांक रवींद्रच्या गावातील हरीश नावाच्या व्यक्तीच्या आयडीवर नोंदवला गेला आहे.

दोन आरोपींचा तपास सुरूया प्रकरणी हरीशला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सांगितले की, हे सिम त्याने 29 डिसेंबर 2023 रोजी त्याच्या आयडीवरून खरेदी केले होते. काही वेळाने गावातील रवींद्र मौर्य आणि शाहिद यांनी त्याला धमकावून सिम हिसकावले होते. पोलीस रवींद्र आणि शाहिदचा शोध घेत आहेत. तसेच, असा फसवा फोन कोणाला आल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असेही मुकेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी