उत्तर प्रदेशच्या बस्ती मेडिकल कॉलेजमध्ये तैनात डॉक्टर जीडी यादव ५ वर्षाआधी मिर्झापूरच्या साधना सिंहच्या प्रेमात पडला होता. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की, प्रेयसी सगळं काही सोडून डॉक्टरजवळ आली. डॉक्टरने नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवत तिला फसवलं. ५ वर्ष उलटून गेले तरी डॉक्टरने तिला ना नोकरी दिली ना लग्न केलं. तिला घर खर्चाला पैसे देणंही बंद केलं. आता तिला तिचं आणि मुलाचं पोट भरण्यासाठी भाजी विकावी लागत आहे.
बस्ती मेडिकल कॉलेजच्या कैली हॉस्पिटलमध्ये तैनात डॉक्टर जीडी यादववर त्याची प्रेयसी साधनाने अत्याचाराचे आरोप लावले आहेत. इतकंच काय तर त्याने तिला खाण्या-पिण्याचं सामान देणंही बंद केलं. ज्यामुळे त्याच्या प्रेयसीला दारोदार भटकावं लागत आहे. आता ती भाजी विकून पोट भरत आहे.
डॉक्टर आणि साधनाचा संपर्क फेसबुकच्या माध्यमातून झाला होता. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. डॉक्टर प्रेयसीला पहिल्यांदा भेटण्यासाठी मिर्झापूरला गेला होता. त्यानंतर साधना सगळं काही सोडून डॉक्टरकडे कानपूरला रहायला गेली. एक वर्ष दोघे कानपूरमध्ये राहिले. डॉक्टरची बदली बस्तीमध्ये झाली. तेव्हा दोघेही तिथे शिफ्ट झाले आणि मेडिकल कॉलेजच्या सरकारी घरात राहू लागले होते.
आरोप आहे की, डॉक्टरने आपल्या प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवत फसवलं. त्यानंतर साधनाने जेव्हा डॉक्टरवर लग्नासाठी दबाव टाकला तर त्याने तिला त्रास देणं सुरू केलं. प्रेयसीचा आरोप आहे की, डॉक्टर रोज रात्री दारू पिऊन घरी येत होता. मारहाण करत होता आणि शिव्याही देत होता. घरातील किराणा आणि दूधही बंद केलं. मुलाचा शाळेत प्रवेशही करत नाहीये.
प्रेयसी म्हणाली की, मुलगा डॉक्टरचाच आहे. पण डॉक्टरला हे मान्य नाही. प्रेयसीने सांगितलं की, डॉक्टर दोनदा मुलींना घरी घेऊन आला होता. मी विरोध केला तर मला घरातून जाण्यास सांगितलं. पण सुद्धा माझं घर सोडून त्याच्याकडे आली होती. त्यामुळे मी दुर्लक्ष केलं.
डॉक्टर जीडी यादव म्हणाला की, फेसबुकच्या माध्यमातून माझा संपर्क झाला होता. जेव्हा तिला समजलं की, मी डॉक्टर आहे तर तिच्या आईला एकदा उपचारासाठी माझ्याकडे घेऊन आली होती. तिने तिची गरिबी आणि परिस्थिती सांगितली. मी तिला घरकामासाठी ठेवून घेतलं. १५ ते २० हजार रूपये महिना तिला पगार देत होतो.
डॉक्टर पुढे म्हणाला की, ही महिला आधीच विवाहित आहे. एका मुलाची आई आहे. तिने मला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. मी जेव्हा पैसे देण्यास नकार दिला तर मला फसवण्याची धमकी दिली. माझ्या घरावर आणि बेडरूम ताबा मिळवला. तर मी घर सोडून गेलो. डॉक्टर म्हणाला की, माझ्या जीवाला धोका आहे.
तेच पोलीस अधिकारी शक्ती सिंह म्हणाले की, साधना नावाच्या महिलेने आपला प्रियकर जीडी यादव आणि त्याच्या आई विरोधात मारहाणीची तक्रार दिली होती. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी केली जात. त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.