नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने पंतप्रधान रिलीफ फंडाच्या नावावर बनावट खाते तयार करून फसवणूक केेल्या प्रकरणात एफआयआर नोंदविला आहे.
याबाबत माहिती देताना दिल्लीचे पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव म्हणाले की, पंतप्रधान मदत निधीसाठी यूपीआयआयडी PMCARES@SBI म्हणजे पीएमकेअर्स @एसबीआय आहे, बनावट खाते PMCARE@SBI अर्थात पीएमकेअर@एसबीआय. दोन्ही आयडीमध्ये (S) एसचा फरक आहे. खरा यूपीआय आयडी पीएमकेअर्स आहे तर बनावट पीएमकेअर. पोलीस आयुक्तांनी पुढे सांगितले की, हे बनावट खाते सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे, त्यानंतर सायबर सेलने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या बनावट खाते बंद केले गेले आहे. एका S या अक्षरामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.
सायबर सेलने सावधगिरीने पैसे दान करण्याचे आवाहन लोकांना केले आहे. जर आपण काही पैसे दान करत असाल तर लक्षात ठेवा की, खरे खाते पीएमसीएआरएस@ एसबीआय PMCARES@SBI आहे. म्हणून, इतर कोणत्याही यूपीआय आयडीमध्ये पैसे जमा करू नका.
विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी शनिवारी देशातील लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आणि त्यासाठी पीएम सिटीझन असिस्टंट आणि रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन (पीएम-केआरईएस) निधी तयार केला आहे. चित्रपट अभिनेता अक्षय कुमारने या निधीसाठी 25 कोटींची देणगी दिली आहे. यानंतर या निधीसाठी अनेकांनी मदतीचा हात दिला असून काही व्यवसायातून फिल्म इंडस्ट्रीत आणि स्टार्सपासून सर्वसामान्यांना मदत करत आहे. परंतु,भारत सरकारच्या पत्र सूचना माहिती कार्यालयाने सुुचना दिली आहे की, पीएम केअर फंडाच्या नावाखाली अनेक बनावट यूपीआय आयडींकडून देणगी मागितली जात आहे.पीएमबीच्या फॅक्ट चेक टीमने ट्विट केले आहे की, “पीएम केअर फंडाच्या नावावर बनावट यूपीआय आयडी पसरवण्यापासून सावध रहा.” पीआयबी फॅक्ट चेक टीमने ट्वीट केले आहे की, पीएम केअर फंडामध्ये दान करण्यासाठी खरा यूपीआय आयडी pmcares@sbi हा आहे. याशिवाय आपल्याकडे एखादी दुसरी लिंक किंवा मेसेजमध्ये हा आयडी नसेल तर देणगी देऊ नका. पीएम फंडाच्या नावाखाली आपली फसवणूक करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.