मुंबई - गिरगावात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला फेसबुकद्वारे केमिकल विकत घेणं खूप महाग पडलं आहे. बनावट फेसबुक तयार करून तीन भामट्यांनी व्यावसायिक उमेश अमृतलाल पंड्या (वय - ५२) यांना २५ लाख ६२ हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी वि. प. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
गिरगावात शांती भुवन येथे राहणाऱ्या उमेश पंड्या यांच्याशी अज्ञात आरोपींशी व्यवसाय करण्यासाठी फेसबुकवरून मैत्री केली. ब्रायन नावाचे केमिकल विकत देण्यासाठी पंड्या यांच्याकडून २५ लाख ६२ रुपये घेत ठगांनी पुजारी हर्बल कंपनीची बनावट पावती तयार करून दिली. त्यानंतर अनेक दिवस उलटले तरी आरोपींनी पंड्या यांना ब्रायन केमिकल दिले नव्हते. त्यानंतर पंड्या यांना फेसबुक खाते बनावट असल्याचे आढळून आले आणि आपली फसवणूक झाल्याचे आढळून आल्यानंतर वि. प. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. अज्ञात ठगांविरोधात भा. दं. वि. कलम ४९९, ४२०, ४६८, ४७१, ३४ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.