मोरगाव : बारामती तालुक्यातील मोरगाव येथील मुख्य चौकात गुरुवारी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान गस्त घालत असताना वाहनचालकाला लायसनची मागणी करणाऱ्या दोन पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. याबाबत अहमदनगर जिल्यातील एका महिलेसह चार व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी(दि. १) मध्यरात्री सर्वत्र नाकाबंदी करण्याचे काम वडगांव निंबाळकर पोलिसांकडुन सुरु होते. यावेळी मुख्य चौकात सुपा बाजुने येणारी स्कॉर्पिओ (क्र एमएच १६ बी.एच ९३८० ) गाडी आली .यावेळी पोलिसांनी गाडीतील चालकास लायसन्सची मागणी केली. याच दरम्यान इटीर्गा कार (क्र एम.एच-१६ एम .४१४१)आली . या दोन्ही गाड्यामधील दादासाहेब पोपटराव कासार ,शिवाजी ठकाराम लोखंडे ,वंदना दादा कासार, अक्षय शिवाजी बेल्हेकर (रा. सर्व वाळकी ता.जि. अहमदनगर) यांनी गाडी चेक व लायन्सची मागणी केल्यावरून शिवीगाळ केली.गस्ती पथकातील पोलिस नाईक प्रदीप काळे यांना छातीवर जोरात लाथ मारत मारहाण केली . तसेच पोलीस नाईक काशिनाथ नागराळे यांना धक्काबुक्की करुन ढकलून दिले . याबात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत वरील सर्वांवरगुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत .
मोरगाव येथे गस्त सुरु असताना पोलिसांना धक्काबुक्की ; महिलेसह चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 6:11 PM