शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

हात उसणे घेतलेल्या पैश्यावरुन मारहाण; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 9:27 PM

Crime News : गुन्हा दाखल : शिरूर अनंतपाळ पोलीसांनी एकास अटक केले

ठळक मुद्देयाप्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्याअंतर्गतच्या चौकीत गुरुवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) - निलंगा तालुक्यातील वांजरवाडा येथील एकास हात उसणे घेतलेले ५०० रुपये का देत नाहीस, असे म्हणत डोक्यात काठीने मारहाण करण्यात आली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी सोलापूरच्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्याअंतर्गतच्या चौकीत गुरुवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योतिराम लालू पवार (३०, रा. वांजरवाडा, ता. निलंगा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील वांजरवाडा येथील ज्योतिराम पवार याने गावातील काशीराम हणमंत जाधव याच्याकडून ५०० रूपये हात उसने घेतले होते. उसने घेतलेले हे पैसे का देत नाहीस म्हणून जाधव याने त्याच्या डोक्यात काठीने मारले. त्या तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्यास गावकऱ्यांनी मदत म्हणून वर्गणी जमा करून सोलापुरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केेले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याबाबत कमळाबाई लालू पवार यांंच्या फिर्यादीवरुन आरोपी काशिराम जाधव याच्या विरोधात कलम ३०२, ३०७, ५०४, ५०६ भादविनुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिरुर अनंतपाळ पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले. अधिक तपास पोउपनि. मल्लया स्वामी हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसlaturलातूरDeathमृत्यूArrestअटक